विभाजन विभीषिका स्मृति दिवस हा भारतामध्ये १४ ऑगस्ट रोजी पाळला जाणारा वार्षिक राष्ट्रीय स्मृती दिवस आहे, जो १९४७ च्या भारताच्या फाळणीदरम्यान बळी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार २०२१ मध्ये याची सुरुवात झाली.
हा दिवस फाळणीच्या काळात अनेक भारतीयांच्या दुःखाचे स्मरण करतो. फाळणीत असंख्य कुटुंबे विस्थापित झाली तसेच लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. भारतीयांना सामाजिक विभागणी, विसंगती दूर करण्याची आणि एकता, सामाजिक समरसता आणि मानवी सबलीकरणाची भावना अधिक बळकट करण्याच्या गरजेची आठवण करून देणे हा या दिवसाचा हेतू आहे.
फाळणीमुळे १० ते २० दशलक्ष लोक विस्थापित झाले आणि २ ते २० लाख लोक मरण पावले.
विभाजन विभीषिका स्मृति दिवस
थोडक्यात पण महत्त्वाचे.