लॉर्ड कॅनिंग

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लॉर्ड कॅनिंग

चार्ल्स कॅनिंग, पहिला अर्ल कॅनिंग तथा लॉर्ड कॅनिंग किंवा व्हायकाउंट कॅनिंग (१४ डिसेंबर, १८१२:ब्रॉम्पटन, लंडन, इंग्लंड - १७ जून, १८६२:ग्रॉसव्हेनर स्क्वेर, लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश भारताचा गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय होता. हा १८५७ च्या स्वातंत्रयुद्धादरम्यान गव्हनर जनरल पदावर होता.

याच्या सद्दीदरम्यान मुंबई विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ या आधुनिककाळातील पहिल्या तीन विद्यापीठांची स्थापना झाली. लॉर्ड डलहौसीच्या सत्ताकालात प्रस्तावित हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा याने पारित केला. याचबरोबर लॉर्ड कॅनिंगने भारतीय पीनल कोड अमलात आणला.

१८५७ च्या युद्धानंतर त्याने सर्वसाधारण सैनिकांना माफी जाहीर केल्यामुळे याला क्लेमेन्सी कॅनिंग असेही टोपणनाव मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →