विनायक कोंडदेव ओक (जन्म : २५ फेब्रुवारी, इ.स. १८४०; - इ.स. १९१५) हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार होत. 'शिरस्तेदार' ही त्यांनी लिहिलेली मराठीतली पहिली लघुकादंबरी. ती इ.स. १८८१ मध्ये प्रकाशित झाली होती.
मुलांना बहुश्रुत बनवण्यासाठी, त्यांना वाचनाचा खरा आनंद देण्यासाठी त्यांनी वाचणे आवश्यक आहे असे शालेय शिक्षणाला जोड म्हणून पूरक वाचन काय देता येईल याचा ज्यांनी विचार केला, त्यात विनायक कोंडदेव ओक यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. विशेष म्हणजे स्वतः ओकांचे शालेय शिक्षण इंग्रजी तिसरीपर्यंतच झाले होते. दरमहा आठ रुपये पगारावर प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला प्रारंभ केला आणि दरमहा १०० रुपये पगार असलेले शिक्षणाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.
विनायक कोंडदेव ओक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.