बालबोध नावाचे लहान मुलांसाठी असलेले मासिक विनायक कोंडदेव ओकांनी १८८१मध्ये सुरू केले.
या मासिकाचे ते ३४ वर्षे संपादक होते. मासिकाचा सर्व मजकूर ते स्वतःच लिहून काढीत. हे मासिक दीर्घकाळ चालले, याचे एक कारण ओकांची सुबोध शैली हे होते. त्यांचे लेखन अतिशय सोप्या मराठीत असे. छोटे-छोटे निबंध लिहून ओकांनी नव्या पिढीला शालेय पुस्तकात नसलेली माहिती दिली. ‘बालबोध’ मासिकातच चारशेहून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
बालबोध (मासिक)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?