प्रा. विजय कृष्णाजी कारेकर (२७ नोव्हेंबर, १९४०: कोल्हापूर - ८ एप्रिल २०२२, पुणे) हे मराठी लेखक, नाटककार, कवी आणि चित्रकार होते. ते पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय, येथील माजी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख होते. प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे हे कारेकर यांचे ज्येष्ठ प्राध्यापक सहकारी होते. प्रा. कारेकर हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला आणि सामाजिक विज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता होते. दिल्ली दूरदर्शनवर त्यांची तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञान आणि जीवन चरित्रे या विषयावर व्याख्याने झाली आहेत. ते युनिक फीचर्स आणि प्रकाशन, पुणे,च्या अनुभव मासिकाचे एक लेखक होते. ‘अनुभव’ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या एका कथेवर ‘गेटवे ऑफ हेवन’ हा लघुचित्रपट निघाला. त्यास संहिता लेखनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. सेवादलात प्रा. कारेकर यांनी काही वर्षे काम केले. श्री. यदुनाथ थत्ते यांच्याबरोबर साधना साप्ताहिकाच्या संपादन कामात सहभाग घेतला.
विजय कारेकर यांचे ०८ एप्रिल २०२२ रोजी पुणे येथे निधन झाले.
विजय कृष्णाजी कारेकर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.