विक्रम पिल्ले (२७ नोव्हेंबर, १९८१:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहेत. पिल्ले सहसा मधल्या फळीत खेळत असे.
पिल्लेने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २००२ मध्ये केली आणि लवकरच त्याने भारतीय संघात आपला जम बसवला. त्याने २००४ च्या अथेन्स ऑलिंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यासोबतच त्यांनी २००२, २००६ आणि २०१० च्या आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल खेळांमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या संघात त्यांचा समावेश होता.
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पिल्लेला प्रदान केला.
निवृत्तीनंतर तो नवीन खेळाडूंना मार्गदर्श करतो.
विक्रम पिल्ले
या विषयातील रहस्ये उलगडा.