अनिल अवचट (१९४४ - २७ जानेवारी, २०२२) हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक होते. त्यांचा जन्म १९४४ मध्ये पुणे जिल्ह्यात झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर १९६८ मध्ये बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली.
त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत त्यांनी पुण्यात "मुक्तांगण" हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. तसेच पश्चिम भारताच्या पातळीवर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केले आणि महिलांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. मुक्तांगणाची गोष्ठ आणि गर्द ऐसी ही दोन पुस्तके त्यांनी मुक्तांगण आणि तेथील रुग्णांचे अनुभव यावर लिहिली आहेत. या सामाजिक कार्यासाठी त्यांना २०१३मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
२०१० मध्ये अवचट यांच्या सृष्टीत..गोष्टीत या कथासंग्रहाला मराठी बाल साहित्य पुरस्कार श्रेणीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
अनिल अवचट
थोडक्यात पण महत्त्वाचे.