प्रा. लछमन परसराम हर्दवाणी हे सिंधी, मराठी व हिंदी या भाषांमध्ये लिहिणारे लेखक, अनुवादक, कोशकार व भाषातज्ज्ञ आहेत.
सिंध प्रांतात जन्माला आलेले प्रा. हर्दवाणी भारताच्या फाळणीनंतर आई-वडिलांबरोबर पुण्याला आले. पुण्यातून एम.ए. केल्यानंतर ते अहमदनगरच्या महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक झाले. स्वतःची मातृभाषा असलेल्या सिंधी बरोबरच त्यांनी हिंदीचे अध्यापन केले. प्रा. हर्दवाणींनी ज्ञानेश्वरी, दासबोध अशा मराठीतील अक्षरवाङ्मयाचे सिंधी भाषेत भाषांतर केले.
प्रा. हर्दवाणी यांची सिंधी, मराठी व हिंदी या भाषांत आजपर्यंत ९० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मतानुसार, संस्कृतपासून निघालेल्या सिंधी भाषेची मूळ-स्वाभाविक लिपी देवनागरीच आहे. ब्रिटिश सरकारच्या काळात तिची लिपी अरेबिकमध्ये कृत्रिमरीत्या करण्यात आली होती. हर्दवाणी यांनी गेल्या चाळीस वर्षांत आपली बहुतेक पुस्तके देवनागरी लिपीत मुद्रित करून स्व-खर्चाने प्रकाशित केली आहेत.
सिंधी, मराठी, हिंदी भाषेतील त्यांची पुस्तके त्यांनी अनेकांना भेट दिली आहेत.
शाह लतीफ सिंधी रिसालो कार सूफी कवि सन १६८९ ते १७५२ या कल्याण अडवाणी लिखित इंग्लिश ग्रंथाचा हर्दवाणी यांनी मराठी अनुवाद केला आहे.
लछमन हर्दवाणी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.