विकास महात्मे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

विकास महात्मे

डॉ. विकास हरिभाऊ महात्मे (जन्म : अमरावती, ११ डिसेंबर १९५७) हे एक भारतीय नेत्र शल्यचिकित्सक आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. डॉ.महात्मे त्यांच्या धर्मादाय आणि सामाजिक कामासाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी एस. महात्मे नेत्र कल्याण धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय नागपूरमध्ये चालवले जाते. रुग्णालयाच्या मुंबई, अमरावती, गडचिरोली आणि पुणे येथे शाखा आहेत.



नेत्रतज्ज्ञ म्हणून केलेल्या धर्मादाय कामासाठी महात्मे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला.

जून २०१६ मध्ये, डॉ. महात्मे राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, ही निवडणूक ते बिनविरोध जिंकले. त्यांच्या उमेदवारीला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला होता.

सध्या (२०१९ साली) ते भारतीय नर्सिंग परिषदेचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →