वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वाराणसी जंक्शन रेल्वे स्थानक

वाराणसी जंक्शन हे भारताच्या उत्तर प्रदेशच्या वाराणसी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-कोलकाता ह्या भारतामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्लीकडून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच ईशान्य भारताकडे धावणाऱ्या गाड्या बहुतेक सर्व गाड्या येथे थांबतात.

भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यातील हे एक भारतीय रेल्वेचे केंद्र आहे व हे वाराणशी कँण्टोंनमेंट रेल्वे स्थानक या नावाने प्रसिद्ध आहे. या स्टेशन मध्ये ९ प्लॅटफॉर्म आणि १३ ट्रॅक्स आहेत. या स्टेशनचे जवळच प्रिपेड ऑटो कम टॅक्सी स्टँड आहे. येथे पार्किंग व्यवस्था आहे. या स्टेशनचा कोड BSB आहे. उत्तर पूर्व रेल्वेच्या वाराणसी विभागाचे मुख्यालय येथेच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →