१५०१७/१५०१८ काशी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. उत्तर पूर्व रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूरच्या गोरखपूर रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांतून धावणारी ही गाडी मुंबई व गोरखपूर दरम्यानचे १,७१० किमी अंतर ३६ तास व ३५ मिनिटांत पूर्ण करते.
बनारस शहराचे काशी हे नाव ह्या गाडीला देण्यात आले आहे. कुशीनगर एक्सप्रेस ही मुंबई व गोरखपूर दरम्यान रोज धावणारी दुसरी गाडी आहे.
काशी एक्सप्रेस
या विषयातील रहस्ये उलगडा.