वामन पात्रीकर

या विषयावर तज्ञ बना.

प्रा. वामन सदाशिव पात्रीकर (जन्म : २८ डिसेंबर १९३६; - १९ एप्रिल २००३) हे मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार होते.

वामन पात्रीकर हे नागपूरला आणि नंतर मुंबईत सरकारी तंत्रनिकेतन विद्यालयात

स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. मराठी लिखाणाची आवड असल्याने ते

दररोज काहीना काही ललित लेखन करत. ’सत्यकथा’, ’किर्लोस्कर’ या मासिकांमधून आणि ’महाराष्ट्र टाइम्स’, ’लोकसत्ता’ या दैनिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असे. हिंदी भाषेतील ’धर्मयुग’ आणि ’कादंबिनी’ या नियतकालिकांतही त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. ते अगदी सोपी, छोटी आणि अर्थपूर्ण वाक्ये लिहीत. त्यांच्या लेखनशैलीची विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, माधव गडकरी आणि गोविंद तळवलकर सारखे लेखक प्रशंसा करीत. पात्रीकरांचे ’विश्वातील विश्वे’ हे पुस्तक त्याकाळचे उत्तम खपाचे पुस्तक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →