उत्तम सदाकाळ हे एक मराठी लेखक, विनोदी कवी आणि कथाकथनकार आहेत. ते एम.ए. बी.एड. आहेत. जुन्नर तालुक्यातील करंजाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते प्राथमिक शिक्षक आहेत.
दैनिक सकाळच्या 'गुदगुल्या' सदरात सदाकाळ यांच्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या आहेत.
सन २०१८ च्या शालेय क्रमिक पुस्तक-बालभारतीच्या 'खेळू करू शिकू' या इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकात मराठीसह इंग्रजी, उर्दू, कानडी, गुजराती, तेलुगू, सिंधी, हिंदी अशा आठ भाषांतील दुसरीच्या पुस्तकांत त्यांच्या 'पाऊस' या कवितेचा समावेश झाला आहे.
सन २०२६ च्या इयत्ता तिसरीच्या बालभारती मराठी पाठ्यपुस्तकात त्यांच्या 'हिरवा वसा' या कवितेचा समावेश झाला आहे.
उत्तम सदाकाळ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.