वाफळे शिलालेख हा सोलापूर जिल्ह्यातील वाफळे येथे असलेल्या एका जुन्या मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीजवळ आहे. याची भाषा संस्कृत असून इ.स.च्या बाराव्या शतकातील नागरी लिपी आहे. या शिलालेखाचा उद्देश यादव सिंघणाच्या नोकरीत असलेल्या नारण (नारायण) नामक व्यक्तीच्या नातवाने उपल येथील तेजेश्वराच्या मंदिराला दिलेल्या निरनिराळ्या देणग्या नमूद करणे हा होता. जैत्रपालाच्या राजवटीत दिलेल्या देणग्या कायम केल्याचा उल्लेखही या शिलालेखात केलेला आहे. विवेकसिंधु ग्रंथ लिहिणारा प्रसिद्ध मराठी आद्यकवि मुकुंदराज हा याच जैत्रपालाच्या पदरीं होता असे म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वाफळे शिलालेख
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?