राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक वस्तुसंग्रहालय आहे. हे संग्रहालय सन. १८९६ ते १९९० पुण्यभूषण पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पावयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. या संग्रहालयाची सुरुवात सन १९२० मध्ये झाली. आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला. अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न होऊ लागला. कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला.
१९२२ साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय, वाड्याच्या साऱ्या दालनांतून वाढवले गेले. राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातले हे वस्तुवैभव पाहून आनंदोद्गार काढले होते.
राजा दिनकर केळकर संग्रहालय
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.