वांगे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वांगे

वांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातील अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. चीन मध्ये सर्वप्रथम वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पीक आल्यावर खंडोबाला वांग्याचे भरीत अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. वांग्याला हिंदीत बैंगन व इंग्रजीत Brinjal किंवा Eggplant म्हणतात. संस्कृतमध्ये वृन्तांकम्, भण्टाकी असे दोन शब्द आहेत.

निघण्टु रत्नाकर या ग्रंथात वृन्तांकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च असा वांग्याचा आयुर्वेदीय उल्लेख आढळतो. तसेच 'वृन्तांकम् बहुबीजानाम् कुष्मांडम् कोमलं विषम् | अर्थात - खूप बिया असलेले वांगे व फारच कोवळे कोहळे खाल्ले असता ते विषाप्रमाणे बाधते असे आयुर्वेदात नमूद केले आहे.-



वांग्यांची भाजी करतात. मोठ्या आकारमानाच्या काळ्या वांग्यांचे भरीत करतात. वांगी घालून वांगीभात होतो. वाळवलेल्या वांग्याचे लोणचेही केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →