वज्रसूची

या विषयातील रहस्ये उलगडा.

वर्णव्यवस्थेवर प्रखर आघात करणारे आद्य लेखन "वज्रसूची" हे मानले जाते. वज्रसूची या संस्कृत ग्रंथात जन्माधारित जातीच्या शुद्धता-अशुद्धतेच्या कल्पनेवर सजेतोड टीका आहे. त्यात अनेक ब्राह्मण ऋषिमुनींचे कूळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे. जातिभेद हा खोटा आहे, हे तत्त्व स्पष्ट रीतीने मांडले आहे.

त्रिपिटक-सूची सन ९७३ ते ९८१ च्या दरम्यान चिनी भाषेत अनुवादित झाली. पण या ग्रंथानुसार वज्रसूचीचा लेखक अश्वघोष नसून धर्मकीर्ती आहे. वज्रसूची'चे संस्कृतमधून मराठीत तुकारामाची ब्राह्मण शिष्या बहिणाबाई हिने पहिले भाषांतर केले. अनुवाद शाहूकालीन कवी श्यामराज तसेच नाथलीलामृताचे कर्ते आदिनाथ गुरव यांनीही केला होता. अगदी अलीकडील अनुवाद डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी यांनी केला.

बौद्ध विचारवंत धर्मकीर्ती यांच्या 'वज्रसूची' या ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले.

वज्रसूचीने जातिव्यवस्थेचे खंडन केले होते. त्यामुळे मध्ययुगीन मराठी संतकवींप्रमाणेच जोतीरावांनाही हा ग्रंथ प्रेरक वाटला. वज्रसूचीच्या आधारे तुकाराम तात्या पडवळ यांनी 'एक हिंदू' या टोपण नावाने ' जातिभेदविवेकसार ' ग्रंथ प्रकाशित केला होता. त्याची दुसरी आवृत्ती जोतीरावांनी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →