तुकारामतात्या पडवळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

तुकाराम तात्या पडवळ (जन्म : वडावरे, रत्‍नागिरी जिल्हा-महाराष्ट्र; - ३ जून, इ.स. १८९८) हे एक मराठी साहित्यिक आणि सत्यशोधक समाजाचे सदस्य होते.

तुकारामतात्यांचे शिक्षण मुंबईत रॉबर्ट मनी हायस्कूलमधून झाले. पेढी स्थापन करून व्यापार करणारे ते बहुधा पहिले भारतीय असावेत. १८८० साली ते थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाले. तुकारामतात्यांचा थिऑसॉफीबरोबर हिंधुधर्मशास्त्राही सूक्ष्म अभ्यास होता. याच धर्मचिंतनाचा उपयोग करून त्यांनी ' एक हिंदू ' या टोपण नावाने ' जातिभेदविवेकसार ' नावाचा ग्रंथ १८६१ साली प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती महात्मा जोतीराव फुले यानी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. तिसरी आवृत्ती १८८४ साली निघाली. वेदोत्तर काळात ब्राह्मणांनी केवळ स्वार्थासाठी वर्णांवरून जाती निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला असावा, याला शास्त्रांत आधार सापडतात, असा निष्कर्य ह्या ग्रंथात काढण्यात आलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →