लीला गांधी (जन्म १९६६) या एक भारतीय वंशाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक सिद्धांतकार आहेत. त्या उत्तर-वसाहत (पोस्ट कोलोनियल) सिद्धांतातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या सध्या जॉन हॉक्स मानविकी आणि इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत आणि ब्राउन युनिव्हर्सिटीच्या पेम्ब्रोक सेंटर फॉर टीचिंग अँड रिसर्च ऑन वुमनच्या संचालिका आहेत. त्या महात्मा गांधींच्या पणतू आहेत.
लीला गांधींनी यापूर्वी शिकागो विद्यापीठ, ला ट्रोब विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले होते. त्या पोस्टकॉलोनिअल स्टडीज या शैक्षणिक जर्नलची संस्थापक सहसंपादीका आहेत. त्या पोस्टकॉलोनिअल टेक्स्ट या इलेक्ट्रॉनिक जर्नलच्या संपादकीय मंडळावर काम करतात. त्या कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ क्रिटिसिझम अँड थिअरीची वरिष्ठ फेलो आहे.
लीला गांधी
या विषयातील रहस्ये उलगडा.