लीग १ (फ्रेंच: Ligue 1) ही फ्रान्स देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. फ्रान्समधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग लोकप्रियतेमध्ये युरोपात सहाव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये फ्रान्समधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी लीग २ ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर लीग २ मधील सर्वोत्तम ३ संघांना लीग १ मध्ये बढती मिळते.
१९३२ सालापासून खेळवल्या जात असलेल्या ह्या स्पर्धेचे नाव २००२ सालापर्यंत डिव्हिजन १ असे होते. आजवर ७६ फ्रेंच लीग १ मध्ये सहभाग घेतला असून ए.एस. सेंत-एत्येनने आजवर १० वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
लीग १
थोडक्यात पण महत्त्वाचे.