लिंकन विमानतळ (आहसंवि: LNK, आप्रविको: KLNK) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील लिंकन शहरातील सार्वजनिक व लष्करी विमानतळ आहे. हा विमानतळ लिंकन विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचे असून लिंकन शहराच्या वायव्येस सुमारे ८ किमी अंतरावर आहे. हा विमानतळ ओमाहानंतर नेब्रास्कामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. हा समुद्रसपाटीपासून ३७२ मीटर (१,२१९ फूट) उंचीवर आहे.
डंकन एव्हियेशन या विमान देखभाल कंपनीचे मुख्यालय येथे आहे.
लिंकन विमानतळाची रचना १९२० च्या दशकात झाली. चार्ल्स लिंडबर्ग यांनी १९२२ मध्ये येथे उड्डाण प्रशिक्षण घेतले होते. १९२८ मध्ये येथे हवाई टपाल सेवा केंद्र उभारले गेले. त्याच वेळी युनायटेड एरलाइन्सने येथे प्रवासी सेवा सुरू केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात याचे नाव लिंकन आर्मी एर फील्ड होते.
टर्म्स ऑफ एंडियरमेंट (१८३), येस मॅन आणि प्लेन्स (२०१३) या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले होते.
लिंकन विमानतळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!