लाहोर ठराव किंवा लाहोर प्रस्ताव,(उर्दू:قرارداد لاہور, क़रारदाद-ए-लाहौर; बंगाली: লাহোর প্রস্তাব, लाहोर प्रोश्ताब) याला स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव असे सुद्धा म्हणले जाते. २२ ते २४ मार्च १९४० मध्ये तत्कालीन भारतातील लाहोर येथे मुस्लिम लीगच्या भरलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात हा ठराव मांडण्यात आला. या ठरावात स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली होती.
या ठरावाचे लिखाण मोहम्मद जफरुल्लाह खान यांनी केले होते. या ठरावानुसार भारताच्या पूर्व आणि पश्चिम मुस्लिम बहुल प्रांताला स्वतंत्र पाकिस्तानचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. नवीन देशाचे पाकिस्तान हे नाव फार पूर्वीच चौधरी रहमत अली यांनी ठरवले होते. परंतु बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि इतर मुस्लिम नेते जवळपास १९३९ पर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्यावर ठाम होते. परंतु इंग्रजांनी अवलंबलेल्या फोडा आणि राज्य करा या कुटणीती मुळे शेवटी हा ठराव पास करण्यात आला.
स्वतंत्र्यानंतर दर वर्षी २३ मार्चला पाकिस्तान मशे यौम-ए-पाकिस्तान म्हणजेच पाकिस्तान दिवस साजरा करण्यात येतो.
लाहोर ठराव
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.