मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार ) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. १८९२ मध्ये लंडन मधील एका कंपनीत ते शिकाऊ म्हणून गेले. १८९३ मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला पुढे ते बॅरिस्टर झाले. २४ ऑगस्ट १८९६ मध्ये बॉम्बे हायकोर्ट मध्ये कामाला लागले. १९०१ मध्ये बॉम्बे म्युनिसिपल बेंचवर प्रेसिडेन्सी न्यायाधीश म्हणून सहा महिन्यांसाठी रुजू झाले. कॉक्स खटला जिंकल्यापासून जिनाना प्रसिद्धी मिळाली. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोहम्मद अली जिना
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.