लाल पूर्णिया गाय

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लाल पूर्णिया गाय किंवा पूर्णिया गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हे मुख्यतः बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यात आणि बिहारच्या लगतच्या अरारिया आणि कटिहार मधेपुरा, पूर्णिया, किशनगंज आणि सुपौल जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. या गोवंशात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असते.

प्राण्यांचा रंग प्रामुख्याने राखाडी आणि त्यानंतर लाल आणि काळा असतो. या गोवंशाची संख्या सुमारे अडीच लाख असल्याचे मानले जाते.

हा गोवंश लहान ते मध्यम आकाराचा असून याची दुग्धोत्पादन क्षमता देखील कमी आहे. परंतु याचे बैल शेतीच्या कामकाजात आणि भार खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त आहेत. बैल सरासरी दिवसाचे ७ ते ८ तास काम करतात आणि एक बैलजोडी अंदाजे सहा तासांत एक एकर जमीन नांगरते. गुरांची ही जात प्रामुख्याने दूध, मशागत आणि खतासाठी वापरली जाते आणि त्यात दुष्काळ आणि उष्णता सहन करण्याची क्षमता देखील चांगली आहे. जवळपास ७०% गुरांना स्थानिक पातळीवर लागवड केलेल्या भात, गहू आणि मका यांच्या पेंढ्या खायला दिल्या जातात. क्वचितच हिरवा चारा किंवा कोणत्याही प्रकारचे पशुखाद्य दिले जाते. बहुतेक जनावरे ही कळपाने चराईसाठी फिरवली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →