लाइपझिश

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लाइपझिश

लाइपझिश (जर्मन: Leipzig) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे.

पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →