ला जेटी

या विषयावर तज्ञ बना.

ला जेटी (फ्रेंच: La jetée ) हा इ.स. १९६२ सालचा फ्रेंच भाषेतील विज्ञानपट गटातील कृष्णधवल लघुचित्रपट आहे. कालप्रवासाच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस मार्करने केले होते. चित्रपटाची लांबी फक्त २८ मिनिटे इतकी आहे. हा लघुचित्रपट असला, तरी हा चलचित्रपट नसून यात स्थिर चित्रांची सलग मालिका आहे. कथेतील पात्रांना थेट संवाद नसून पार्श्वभूमीला निवेदकामार्फत प्रसंगानुरूप निवेदन आहे. टाईम मासिकाने इ.स. २०१० साली कालप्रवासावर आधारित सर्वोत्कृष्ट विज्ञानपटांत याला स्थान दिले होते.

या चित्रपटावरूनच प्रेरित होऊन टेरी जिलिअम या दिग्दर्शकाने इ.स. १९९५मध्ये ट्वेल्व्ह मंकीज हा इंग्रजी चित्रपट बनवला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →