यमधर्म, यम किंवा यमराज ही हिंदू वेद पुराणांप्रमाणे मृत्यूची देवता तथा प्रथम पितर आहे. वैदिक परंपरेनुसार, यम हा पहिला मानव होता जो मरण पावला आणि मृत्यूचा अधिपती झाला.
जुन्या लिखाणाप्रमाणे यमराज ही एक वैदिक देवता आहे. हा विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची आई होय. मात्र याच वेळी यमराज हे सूर्यपुत्र आहेत अशी ही धारण आहे. हा भेद पूर्वीच्या काळी अनेक यम झाल्याचे दर्शवते. तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( ऋ. १०.१६५.४ ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो. भगवान शनि महाराज हे यमाचे भाऊ आहेत. महाभारत काळात मांडव्य ऋषींच्या शाप वाणीमुळे विदुराच्या रूपात यमराजाचा जन्म पृथ्वीवर झाला होता. जो कोणी या पृथ्वीतलावर जन्माला येईल त्यालाही मरावे लागेल. पशू, पक्ष्यांपासून ते झाडे-वनस्पती, नद्या, पर्वत, सर्वांचा अंत निश्चित आहे. पण मृत्यूचा देव यमराज कोणाला कधी, कोणत्या ठिकाणी मरायचे हे ठरवतो. जीव घेण्याचा अधिकार यमराजालाच आहे. गरुड पुराण आणि कठोपनिषद ग्रंथात यमपुरी किंवा यमलोकाचा उल्लेख आहे. मृत्यूच्या बारा दिवसांनंतर, मानवी आत्मा यमलोकाचा प्रवास सुरू करतो.
यम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?