मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे.
परम सत्य मृत्यू*
मृत्यू तर नियती आहे. कितीही टाळला तरी तो येणारच आहे. अस थोडच आहे की तुम्ही ऐंशी वर्षाच्या झालात आणि लगेच मेलात? तर नाही ऐंशी वर्षापर्यंत मृत्यू तुमच्या आसपास फिरत असतो. तुमच्या शरीरामध्ये असतो, तुमचा शरीराबरोबर, वयाबरोबर तोही मोठा होत असतो. आणि एक दिवस तुम्हाला पूर्णपणे घेरून तुमच. जीवन संपवून टाकतो. मृत्यु तर धर्मच आहे शरीराचा. जन्म आणि मृत्यू कोणत्याही सजीवाच्या आयुष्यरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत.
एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनांतून विश्लेषण करता येते. :-
वैद्यकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि तिसरे आध्यात्मिक दृष्टिकोनातून.
मृत्यू
या विषयातील रहस्ये उलगडा.