लहू के दो रंग (१९७९ चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लहू के दो रंग हा महेश भट्ट दिग्दर्शित १९७९ मधील हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात विनोद खन्ना, शबाना आझमी, डॅनी डेन्झोंग्पा, हेलन, रणजीत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत आणि गीते बप्पी लहिरी आणि फारुख कैसर यांचे आहेत.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सूरज सनीम यांनी लिहिले होते. याचे चित्रीकरण हाँगकाँग आणि भारतात झाले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर "हिट" म्हणून रेटिंग देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →