रेजिना किंग

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रेजिना किंग

रेजिना रेने किंग (जन्म १५ जानेवारी १९७१) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. तिला अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि चार प्राइमटाइम एमी पुरस्कारांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत. २०१९ मध्ये, टाइम मासिकाने तिला जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नोंदवले होते.

२२७ (१९८५-१९९०) या दूरचित्रवाणी मालिकेत ब्रेंडा जेनकिन्सच्या भूमिकेसाठी किंगने प्रथम प्रेक्षकांचे लक्ष वेधले. तिच्या त्यानंतरच्या भूमिकांमध्ये फ्रायडे (१९९५), ॲनिमेटेड मालिका द बूनडॉक्स (२००५-२०१४), आणि क्राइम दूरचित्रवाणी मालिका साउथलँड (२००९-२०१३) यांचा समावेश होता. तिला एबीसी अँथॉलॉजी मालिका अमेरिकन क्राइम (२०१५-२०१७), नेटफ्लिक्स लघु मालिका सेव्हन सेकंद आणि एचबीओ मालिका वॉचमन (२०१९) मधील तिच्या भूमिकांसाठी चार प्राइमटाइम एम्मी पुरस्कार मिळाले. तिच्या इतर दूरचित्रवाणी भूमिकांमध्ये ड्रामा मालिका द लेफ्टओव्हर्स (२०१५–२०१७) आणि सिटकॉम द बिग बँग थिअरी (२०१३–२०१९) यांचा समावेश आहे.

बॉईज एन द हूड (१९९१), पोएटिक जस्टिस (१९९३), ए थिन लाइन बिटवीन लव्ह अँड हेट (१९९६), हाऊ स्टेला गॉट हर ग्रूव्ह बॅक (१९९८), आणि रे (२००४), या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या आहेत. तसेच डाउन टू अर्थ (२००१), लीगली ब्लॉन्ड २: रेड, व्हाईट अँड ब्लोंड (२००३), अ सिंड्रेला स्टोरी (२००४), आणि मिस कॉन्जेनिलिटी २: आर्म्ड अँड फॅब्युलस (२००५) या कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील तिचे पात्र आहेत. इफ बील स्ट्रीट कुड टॉक या २०१८ मधील चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवून समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. त्यानंतर तिने द हार्डर दे फॉल (२०२१) मध्ये काम केले आहे.

किंगने २०१५ आणि २०१६ मध्ये स्कँडल आणि २०१७ मध्ये दिस इज अस यासह अनेक दूरचित्रवाणी शोसाठी अनेक भागांचे दिग्दर्शन केले आहे. तिने २०१० मध्ये जेहेमच्या " फाइंडिंग माय वे बॅक " गाण्यासाठी संगीत व्हिडिओ देखील दिग्दर्शित केला आहे. किंगच्या चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण २०२० मधील वन नाईट इन मियामी... या चित्रपटाद्वारे झाला. ह्याने तिला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि फर्स्ट टाइम फीचर फिल्मसाठी डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका अवॉर्डसाठी नामांकन मिळालं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली ही दुसरी कृष्णवर्णीय महिला ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →