डायना ओलेक्सांद्रिव्हना यास्त्रेम्स्का ( युक्रेनियन:Даяна Олександрівна; १५ मे, २०००:ओडेसा, युक्रेन - ) ही एक युक्रेनियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
यास्त्रेम्स्काचा युक्रेनमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर ओडेसा येथे मरीना आणि ओलेक्सांदर यास्त्रेम्स्की यांच्या घरी झाला. तिला सहा वर्षांनी लहान असलेली इव्हाना नावची बहीण आहे. तिचे वडील व्हॉलीबॉल खेळाडू होते आणि त्यांनी ओडेसाचे नगरसेवक होते. यास्त्रेम्स्का पाच वर्षांची असताना तिच्या आजोबा इव्हान यांनी तिला टेनिस खेळायला शिकवले.
२०२२ मध्ये युक्रेनवर झालेल्या रशियन आक्रमणादरम्यान, यास्त्रेम्स्का २६ फेब्रुवारी रोजी तिची धाकटी बहीण इव्हानासोबत सुरक्षिततेसाठी फ्रान्सला पळून गेली, तिला तिच्या पालकांना तिच्या मूळ गावी ओडेसा येथे सोडावे लागले.
डायना यास्त्रेम्स्का
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.