लॉरा एलिझाबेथ डर्न (जन्म १० फेब्रुवारी १९६७) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी अवॉर्ड, एक बाफ्टा अवॉर्ड आणि पाच गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स यासह ती अनेक पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे.
ब्रूस डर्न आणि डियान लॅड या अभिनेत्यांच्या पोटी जन्मलेल्या, लॉराने १९८० च्या दशकात अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली आणि मास्क (१९८५), ब्लू वेल्वेट (१९८६) आणि वाइल्ड ॲट हार्ट (१९९०) मधील तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाली. रॅम्बलिंग रोझ (१९९१) या नाट्य चित्रपटातील तिच्या शीर्षकाच्या अनाथ मुलीच्या भूमिकेसाठी तिला तिचे पहिले अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले आणि आफ्टरबर्न (१९९२) या दूरचित्रवाणी चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. स्टीव्हन स्पीलबर्गच्या जुरासिक पार्क (१९९३) या साहसी चित्रपटातील एली सॅटलरच्या भूमिकेसाठी तिला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, ही भूमिका तिने नंतर ज्युरासिक पार्क ३ (२००१) आणि ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन (२०२२) या भागांमध्ये पुन्हा साकारली.
दूरचित्रवाणी चित्रपट रिकाउंट (२००८) मधील कॅथरीन हॅरिस (फ्लोरिडा येथील अमेरिकन रिपब्लिकन राजकारणी) आणि कॉमेडी मालिका एनलाईटेन्ड (२०११-२०१३) मधील ॲमी जेलिकोच्या भूमिकेसाठी दोन गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, डर्नने चेरिल स्ट्रेडची (अमेरिकन लेखीका) आई म्हणून तिच्या अभिनयासाठी तिचे दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन मिळवले; बायोपिक वाइल्ड (२०१४) या चित्रपटासाठी. २०१७ आणि २०१९ मध्ये, तिने बिग लिटल लाईज या नाट्य मालिकेत रेनाटा क्लेन म्हणून काम केले व प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकला. स्टार वॉर्स: द लास्ट जेडाय (२०१७), लिटल वुमन (२०१९), आणि मॅरेज स्टोरी (२०१९) या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या होत्या. यातील शेवटच्या चित्रपटात घटस्फोटाचा वकील म्हणून तिने केलेल्या कामगिरीमुळे तिला अकादमी पुरस्कार आणि तिचा पाचवा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
लॉरा डर्न
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!