रेगन्सबुर्ग

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

रेगन्सबुर्ग

रेगन्सबुर्ग (जर्मन: Regensburg) हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. रेगन्सबुर्ग जर्मनीच्या आग्नेय भागात व बायर्नच्या पूर्व भागात डॅन्यूब नदीच्या काठावर वसले आहे. सुमारे १.४ लाख लोकसंख्या असलेले रेगन्सबुर्ग म्युनिक, न्युर्नबर्ग व आउग्सबुर्ग खालोखाल बायर्न राज्यातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

११३५ ते ११४६ दरम्यान रेगन्सबुर्गमध्ये डॅन्यूब नदीवर एक दगडी पूल बांधण्यात आला ज्यामुळे उत्तर युरोप व व्हेनिसदरम्यान व्यापाराला चालना मिळाली व रेगन्सबुर्गचे महत्त्व वाढले. मध्य युगातील पवित्र रोमन साम्राज्यकाळात रेगन्सबुर्ग हे एक स्वायत्त शहर होते. १५४२ साली रेगन्सबुर्गने प्रोटेस्टंट सुधारणांचा अंगिकार केला. इ.स. १८०३ साली रेगन्सबुर्गची स्वायत्तता संपुष्टात आली व १८१० साली ते बायर्नच्या राजतंत्रामध्ये सामावून घेण्यात आले.

२००६ साली रेगन्सबुर्गला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये स्थान देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →