रेकी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रेकी

रेकी (霊気, / ˈr eɪ k i /) हा एक उर्जा उपचाराचा जपानी प्रकार आहे, जो पर्यायी औषधांचा उपसंच आहे. रेकी प्रॅक्टिशनर्स 'पाम हीलिंग' किंवा 'हँड-ऑन हीलिंग' नावाचे तंत्र वापरतात ज्याद्वारे भावनिक किंवा शारीरिक उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी "सार्वभौमिक ऊर्जा" प्रॅक्टिशनरच्या तळहाताद्वारे रुग्णाला हस्तांतरित केली जाते.

ही एक आध्यात्मिक प्रथा आहे. जी मिकाओ उसुई यांनी १९२२ मध्ये विकसित केली होती. ही एक जपानी ध्यानाची आणि उपचाराची पद्धत आहे जी योगासमान आहे. यात 'रे' म्हणजे 'सर्वव्यापी' तर 'की' म्हणजे 'जीवनशक्ति', अर्थात जी सर्वव्यापी जीवनशक्ती किंवा प्राणशक्ती आहे ती. अनेकदा रेकीचा स्वैर अनुवाद 'संजीवनी शक्ति' म्हणून सुद्धा केला जातो.

जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक दृष्टीने आजारी पडते तेव्हा त्या व्यक्तीला दिली जाणारी औषधी द्रव्ये म्हणजे तिच्यावर केलेले बाह्योपचार असतात. रेकीच्या नियमानुसार व्यक्ती तेव्हा आजारी पडते जेव्हा तिच्यात अंतर्गत उणीवा किंवा दोष निर्माण होतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरात आतून बिघडलेली अंतःस्थ शक्ती पुनर्प्रवाहित केली असता, तिच्यात शारीरिक, मानसिक तथा आध्यात्मिक प्रगती दिसून येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →