(Sanskrit and Hindi: अखाड़ा मुस्लिम आक्रमणे सुरू झाल्यावर हिंदूंचा छळ होऊ लागला आणी हिंदू धर्म धोक्यात आला म्हणून, ज्ञान आत्मसात करण्याच्या कार्याबरोबरच, आखाड्यांनी परकीय आक्रमणे परतवून लावण्यासाठी शस्त्रास्त्रे चालवणाऱ्या लष्करी संत संघटना उभारल्या त्यांना आखाडे असे म्हणतात. यांचा विस्तार भारतभर आहे. उत्तर भारतापासून गोदावरी नदीपर्यंतच्या सर्व पंथातील संत तपस्वींचे संघांमध्ये वर्गीकरण केले आहे हे संघ म्हणजे आखाडे होय. आखाडे हे मठ आणि आश्रम व्यवस्थेपेक्षा निराळे आहेत. कुंभमेळ्याला येणारे सर्व आखाडे उत्तर भारतातील आहेत. हिंदू धर्मावरील आघातांचा सर्वाधिक धोका उत्तर भारतावर होता. तुलनेने दक्षिण भारत शांत होता. परिणामी, ज्ञानमार्गाचे अनुसरण करणारे विद्वान दक्षिणेत आढळतात, तर भक्तीमार्गाचे अनुसरण करणारे उपासक उत्तर भारतात आढळतात. आखाडा हा जातिभेद विरहीत असतो. येथे सर्वांना प्रवेश आहे. आदि शंकराचार्यांचा असाही विश्वास होता की परकीय आक्रमकांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हिंदू संत आणि साधूंनी स्वतःला शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवणे आवश्यक आहे, आणि अशा प्रकारे, संतांना शस्त्र चालवणे, लढाई धोरणे, मल्ल-युद्ध , तसेच धार्मिक वादविवाद आणि चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी आखाडे बनवले गेले.
सुरुवातीला चार आखाडे होते , जे पुढे १३ आखाड्यात विस्तारले गेले .
आखाडा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.