मठ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मठ हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ 'संस्था किंवा महाविद्यालय' असा होतो आणि त्याचा संदर्भ देखील आहे. आदी शंकराचार्यांनी सुरू केलेली उपासनेची कायमस्वरूपी व्यवस्था असलेली मठ ही कायमस्वरूपी संस्था आहे. सनातन धर्माच्या प्रतिष्ठेसाठी आदि शंकराचार्यांनी भारतातील चार प्रांतात चार मठांची स्थापना केली. धार्मिक आदेशांसाठी केंद्रे म्हणून भारतातील मोक्याच्या ठिकाणी चार मठांची स्थापना केली होती मठ हे मंदिर ही असते. मठ - यती, गोसावी, ब्रह्मचारी आदींचे राहण्याचें स्थान आहे. हे आश्रम आणि आखाडा यापेक्षा पेक्षा वेगळे असते. शंकराचार्यांच्या पाठोपाठ रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य यांनीही मठांची स्थापना केली. मठ हा साधूंसाठी असतो. त्यांचे कार्य हिदू धर्माचा लोकांमध्ये प्रसार करणे हे असते. हठयोगात मठाचा उल्लेख योगींसाठी निवासस्थान म्हणून केला गेला आहे. भारतात अनेक मठ मंदिरे दिसतात. दैनंदिन कामकाज टिकवून ठेवण्यासाठी मठामध्ये संस्थात्मक रचना असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →