जनार्दन स्वामी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जनार्दन स्वामी (शके १४२६ - १४९७) हे एकनाथ महाराजांचे गुरू होते. औरंगाबाद जवळील



देवगिरी किल्ल्याचे ते किल्लेदार होते.



थोर दत्तोपासक श्रीजनार्दनस्वामी इस्लामी सत्तेत देवगिरी अथवा दौलताबाद येथे अधिकारावर राहून दत्तोपासनेचा प्रसार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत.



फाल्गुन वद्य ६ शके १४२६ रोजी यांचा जन्म चाळीसगावच्या देशपांडे घराण्यात झाला. शके १४४७ मध्ये त्यांनी एकाच कुलगोत्रातील दोन मुलींशी लग्न करून गृहस्थाश्रमास प्रारंभ केला.

भगवच्चिंतन, स्नानसंध्यादि कर्मे, अतिथिसेवा, राजकार्य आणि सावित्री-रमा या दोन स्त्रियांशी संसार; असा त्यांचा जीवनक्रम होता. राजकारणात नित्य दगदग, वसुली, अधिकारी लोकांची ताबेदारी, यवनांची लहर, इस्लामी लोकांशी संबंध यांतून त्यांना मार्ग काढायचा होता. स्वधर्मनिष्ठा राखायची होती. घरातील दत्तोपासना वाढवायची होती. कृष्णातीरी अंकलखोप, कुरवपूर, वाडी, औदुंबर इत्यादी दत्तस्थानांना ते भेटी देत असत. अंकलखोप येथे त्यांना दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला.

देवगिरीच्या जवळच पाचसहा मैलांच्या परिसरात शुलभंजन शिखराच्या सपाटीवर शिवमंदिरे आहेत. तेथेच सूर्यकुंड नावाचे एक तळे आहे. याच भागात सहस्रलिंग म्हणूनही एक स्थान आहे. दाट झाडी व एकान्त यांमुळे जनार्दनपंत दत्तध्यानासाठी येथे येत असत. . अनेकांना या ठिकाणी साक्षात्कार होत असत. याच ठिकाणी जनार्दनस्वामींना दत्तांचा साक्षात्कार झाला. दत्तावधूताने कलियुगातील पहिला शिष्य जनार्दन केला असे नाथांनी म्हणले आहे. या दत्तसाक्षात्काराचे वर्णन संत एकनाथ यांनी आपल्या एकनाथी भागवतात केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →