चतुःश्लोकी भागवत हा संत एकनाथ यांचा पहिला ग्रंथ आहे. त्यांचे गुरू श्री जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेने व त्यांच्या सहवासात नाथांनी हा ग्रंथ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे इ.स. १५५१च्या सुमारास लिहीला.
श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथील संत स्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर हे नाशिक जिल्ह्या मधील वारकरी संप्रदायाचे सर्व परिचित असे महत्वाचे आणि अधिष्ठान असलेले स्थान आहे. त्याच प्रमाणे नाशिक शहरातील तपोवन येथेही हे शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज मंदिर ही महत्वाचे आणि अधिष्ठान प्राप्त असे स्थान आहे. 'देवगिरी (दौलताबद) किल्यात असलेल्या चरण कमलां प्रमाणे' इथेही फक्त पादुका स्थापित केलेल्या आहे.
शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज म्हटलं कि, वारकरी व दत्त संप्रदाय यांचे विलक्षन मिलन घडल्याचे दिसून येते.
नाशिक मधील तपोवन येथे कपिलमुनींनी तपश्चर्या केली, ज्या ठिकाणी तपश्चर्या केली तिथे असलेल्या नदीस व संगमास "कपिल संगम" असे म्हणतात. पुढे जाऊन शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे गुरु, म्हणजेच भगवान दत्तात्रय ज्यांना नित्य येऊन दर्शन व उपदेश करीत, असे भगवान दत्तात्रयांचे निस्सिम भक्त असलेले, देवगिरी किल्ल्याचे (दौलताबाद) किल्लेदार "श्री जनार्दन स्वामी महाराज" यांचे नाशिक मधील तपश्चर्येचे ठिकाणही हेच होते.
"एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यातला पहिला ग्रंथ लिहिला तो म्हणजे "चतुःश्लोकी भागवत", या ग्रंथाचे संपूर्ण लिखान नाथांनी तपोवन, नाशिक मध्ये लिहीले. येथेच त्यांनी तो ग्रंथ आपल्या गुरूंना ऐकवला, नाथ महाराजांच्या या पहिल्याच ग्रंथाची रचना व लिखाणातील भाव बघून त्यांचे गुरू अतिशय प्रसन्न झाले. "भगवान पांडुरंग परमात्मा, तुझ्या मुखातून भागवताच्या एकादश स्कंदाचे विवेचन करून घेशील" असा आशीर्वाद नाथांच्या गुरुनी याच ठिकाणी नाथांना दिला.
शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी त्यांच्या हस्तलिखितामध्ये लिहल्या नुसार, साधारणतः दोनशे वर्ष आगोदर केशवकृत नामाचा, शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा चरित्र ग्रंथ लिहला आहे, त्यातील ' ग्रंथ लेखणाची सुरुवात' या प्रकरणातील कथेच्या आधारे, "नाथांची तीर्थयात्रा ग्रंथरचनारंभ-विवाह." या पुस्तकात कथा येते, ती पुढील प्रमाण…
एके दिवशी जनार्दनस्वामी नाथांस म्हणाले, " एकदां नासिक पंचवटीस जाऊन यार्वे, असें पुष्कळ दिवस माझ्या मनांत आहे. तर तिकडे जाण्याची तयारी करा." मग एक दिवस ठरवून व प्रवासाची सर्व सामग्री बरोबर घेऊन, त्या दिवशीं ही गुरुशिष्यांची जोडी अश्वारूढ होऊन तीर्थयात्रेस निघाली, वाटेंत एखादें रमणीय स्थळ आढळलें की तेथें मुक्काम करावा, असा क्रम त्यांनी ठेवला होता. कांहीं दिवसांनी ही मंडळी एका गांवांत येऊन पोचली, तेथे चंद्रभट नामक एक ब्राह्मण मोठा हरिभक्त होता, त्याच्या घरी त्यांनी मुक्काम केला. रात्रौ फलाहार झाल्यावर चंद्रभटानी पोथी सोडली आणि चतुःश्लोकी भागवताचे उत्कृष्ट विवरण केलें, महीपति म्हणतातः-
मग एकनाथ आणि जनार्दन। तया समीप वैसती येऊन । म्हणती धन्य आजिचा सुदिन। जाहलें दर्शन संतांचें ॥ प्रेमळ श्रोते सर्वज्ञ निपुण मिळतां उल्हासे त्याचें मन । अर्थ सांगतसे प्रांजळ करून ऐकतांचि मन वेधतसे ॥ अनुभवाच्या गोष्टी सांगत। कंठ होतसे सद्गदित । प्रेमें नेत्रीं अश्नु वाहत । विदेह स्थिति तिघांची ॥ मजला वाटतसे साचार। कीं ब्रह्मा विष्णू महेश्वर। तिन्ही मिळाले एकत्र । तैसा विचार तो झाला ॥
चंद्रभटांचा प्रेमळपणा आणि साधुशील पाहून, अशा पुरुषाचा सहवास आपणास नित्य घडेल तर किती चांगलें होईल असें जनार्दनस्वामी व नाथ या उभयतांस वाटलें, दुसरे दिवशी पहांटे ते गुरुशिष्य प्रवासास निघणार तों चंद्रभटानीं त्यांस विनंति केली की, आजचा दिवस येथे मुक्काम करून माझा आश्रम पवित्र करावा. स्वामीनी ही त्यांची विनंति मान्य केली. नंतर स्नानसंध्या, भोजनादि नित्य-कर्म आटोपल्यावर, चंद्रभटानीं स्वामींस म्हटलें, " महाराज, आपल्या सहवासाचा लाभ घडावा अशी माझी इच्छा आहे. " स्वामीनीं सांगितलें, "आम-चेंही मनोगत तसेंच आहे." हैं ऐकून चंद्रभटांस मोठा आनंद झाला. दुसरे दिवशीं पहांटे, ते तिघेही प्रवासास निघाले, कांहीं दिवसांनी ते पंचवटीस आले. तेथें यथा. स्थित तीर्थविधि केल्यावर श्रीरामचंद्राचें त्यांनीं दर्शन घेतलें. सर्व मंडळी परत बिऱ्हाडीं आल्यावर, जनार्दनस्वामी नाथांस ह्मणाले, "नाथ, चंद्रभटजीनीं हैं चतुः-श्लोकी भागवत बरोबर आणलें आहे. त्यावर तुम्ही प्राकृत टीका करावी अशी माझी इच्छा आहे. तरी या ठिकाणी आपण आहोंत तोपर्यंत, तेवढी टीका तुह्मी लिहून काढा." ही गुर्वाज्ञा ऐकून नाथांस मोठा आनंद झाला. त्यांनीं त्याच दिवशीं टीका-रचनेस प्रारंभ करून थोड्याच दिवसांत ग्रंथ लिहून पुरा केला व तो स्वामीस दाखविला. स्वामीस ती रचना फार आवडली व चंद्रभट तर नित्य तिचें पारायण करूं लागले. भागवताच्या एकादशस्कंधाची टीका पुढें पांडुरंग तुझ्या मुखानें वदवील असेंही स्वामीनीं नाथांस सांगितलें. चंद्रभट स्वतः मोठे विद्वान् असून कर्म, उपा-सना आणि ज्ञान या तीन्ही मार्गात त्यांची चांगली गति होती, तथापि, चतुःश्लोकी भागवतावरील नाथांची टीका त्यांस फार आवडली व त्या टीकेंत नाथांनी प्रगट. केललें अगाध अध्यात्मज्ञान पाहून, ही हरिहरांची जोडी गुरुशिष्यरूपानें जगदुद्धारार्थ अवतरली आहे, असें त्यांस वाटलें, टीका पुरी झाल्यावर, ते तिघेही पंचवटीहून निघून त्र्यंबकेश्वरी गेले व तेथील तीर्थविधि आटोपल्यावर, जनार्दनस्वामी परत देवगिरीस आले. संत समागमामुळे चंदभट संसाराविषयीं अगदीं उदासीन झाले होते; श्री चंद्रभट (चांदबोधला) नामक हे ब्राम्हण याच पवित्र स्थानी नेहमी येऊन भागवताचे पारायण व चिंतन करत असत. म्हणून आपले गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे नाशिक मधील तपश्चर्येचे ठिकाण व भागवताचे लेखन झालेल्या या सिद्ध परिसरात एकनाथ महाराजांनी मंदिर निर्माण करून येथे त्यांचे गुरू जनार्दनस्वामी महाराजांच्या पादुका स्थापित केल्या. पुढे महाराष्ट्रातील भागवताचे अभ्यासक येथे येऊन भागवताचे अध्ययन करत.
आत्ता मंदिरात असलेली गरुडावर विराजमान अशा भगवान विष्णुंची मुर्ती नंतरच्या काळात भाविकांनी स्थापित केली, असे नाशिक मधील जुनी जाणकार व इतिहास अभ्यासक मंडळी सांगत.
पूर्वी नाशिक शहर हे जुने नाशिक व पंचवटी एवढेच मआर्यदित होते. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथांची पालखी आषाढी वारीसाठी त्रंबकेश्वर येथून पंढरपूरकडे जाण्याची सुरुवात जेव्हा पासून झाली, तेव्हा पासून जातांना पालखीचा दुसरा मुक्काम नाशिक मध्ये ज्या मंदिरात होत असतो, ते मंदिर म्हणजे जुने नाशिक मधील संत नामदेव विठ्ठल मंदिर. प्रवास दरम्यान मुबलक व्यवस्था असाव्यात किंवा त्या वेळी हे मंदिर त्या सोईंनी सज्ज आसवे म्हणून नियोजन करत्यांनी हे मंदिर मुक्कामासाठी निश्चित केले. जुने नाशिक मधील संत नामदेव विठ्ठल मंदिर नाशिक मधील वारकरी संप्रदायाचे त्याकाळातील प्रमुख स्थान असावे. त्याच मंदिरातून परंपरेने नाशिक मधील सर्व भजनी मंडळ फाल्गुन कृ.६ (नाथ षष्ठी) या दिवशी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीने तपोवन येथील या मंदिरात येत व भजन, किर्तन करत. तसेच जुने नाशिक येथील पवार कुटुंबीय दहिकालाच्या प्रसादाचे वाटप करत. पालखीच्या स्वरूपात इथे येणे हे जरी कालांतराने बंद झाले असले, तरीही जुने नाशिक मधील संत नामदेव विठ्ठल मंदिर येथील आम्ही सर्व सेवेकरी नियमाने येथे येत व नाथ षष्टीचा सर्व उत्सव मोठ्या श्रद्धा भावाने साजरा करत. ही परंपरा अखंडपणे चालूच आहे.
उत्सवाचा इतिहास - फाल्गून. वद्य. ६ ह्या दिवशी पाच मोठ्या घटना घडलेल्या असल्याने त्यांस "पंचपर्व" असे म्हणतात. एकनाथ महाराज स्वतः आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून या दिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.
एवढ्या दिवसांपासून ची अखंडपणे परंपरा जोपासत असताना या परंपरे मागचे कारण काय? याच्या उत्सुकतेमुळे मी, श्री ऋषिकेश वासुदेव काळे चिकित्सक बुद्धीने मंदिरातील जुन्या जाणकार वयोवृद्ध व्यक्तीना विचारणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार "शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी "ज्ञानेश्वरीची शुद्धी व चतुरश्लोकी भागवत" याच पवित्र स्थानी लिहिले आहे. म्हणून आपण परंपरेने या मंदिरात येऊन एकनाथ षष्ठीचा उत्सव साजरा करत असतो असे सांगितले. एवढे महत्त्वाचे स्थान नाशिक मध्ये आहे, हे नाशिक मधील इतरही वारकरी संप्रदायातील लोकांना ज्ञात व्हावे या प्रामाणिक हेतूने मी, या संदर्भातील सर्व माहिती सोशल मीडियाच्या संकेतस्थळावरती प्रसारित केली. त्या माहितीच्या प्रसारामुळे शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी यांनी संपर्क साधला, त्यांनी त्या पोस्ट मधील त्रुटी समजावून सांगितली. "नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्धी श्रीक्षेत्र पैठण येथे केली आहे, याचे उल्लेख आहेत, असे सांगितले. भागवताची निर्मिती नाथ महाराजांनी तीर्थयात्रेदरम्यान केली असल्याने, नाशिक मधील या स्थानावरती भागवताच्या काही भागाचे लिखाण झाले असू शकते," असे त्यांनी सांगितले.
काही दिवसा नंतर मी श्री ऋषिकेश वासुदेव काळे भागवत ग्रंथातील प्रास्ताविक मध्ये, ग्रंथ लिखाणाची सुरुवात या भागामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे असे आढळले. की "एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यातला पहिला ग्रंथ लिहिला तो म्हणजे "चतुःश्लोकी भागवत", या ग्रंथाचे संपूर्ण लिखान नाथांनी तपोवन, नाशिक मध्ये लिहीले. येथेच त्यांनी तो ग्रंथ आपल्या गुरूंना ऐकवला, नाथ महाराजांच्या या पहिल्याच ग्रंथाची रचना व लिखाणातील भाव बघून त्यांचे गुरू अतिशय प्रसन्न झाले. "भगवान पांडुरंग परमात्मा, तुझ्या मुखातून भागवताच्या एकादश स्कंदाचे विवेचन करून घेशील" असा आशीर्वाद नाथांच्या गुरुनी याच ठिकाणी नाथांना दिला.
पंचपर्व -
१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म दिवस.
२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह याच दिवशी.
३) नाथांना स्वार्मीचे प्रथमदर्शन व अनुग्रह याच दिवशी.
४) श्री जनार्दनस्वामी यांची पुण्यतिथी याच दिवशी.
५) शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांच्या जलसमाधीचा हाच दिवस.
नासिक मधील अधिष्ठान प्राप्त अशा या मंदिराची शाश्वत व खरी ओळख नाशिककरांना व्हावी याकरता प्रयत्न करत असताना, या मंदिराची "मारीच मंदिर" अशी खोटी ओळख स्थानिक रहिवाशांनी आपल्या स्वार्थासाठी केलेली आहे हे लक्षात आले. मंदिर परिसरातील लोक पूर्वी पासून येणाऱ्या भाविकांकडून पैसे कमावण्याचे साधन म्हणून या मंदिराचा वापर करत असत, हे लक्षात आले. त्या प्रमाणे "श्री मारीच मंदिर (एकनाथ मंदिर), तपोवन, नाशिक." असे येथे असलेल्या मंदिराच्या संस्थेचे नाव 1960 च्या दशकात नोंदणीकृत केलेले आहे.
तसे बघितले तर 'मारीच या राक्षसाचा' वध रामरायांनी केला ते स्थान नांदूर मध्यमेश्वर येथील आहे. मारिच नामक हरणाच्या ज्या अवयवाला बाणाने इजा झाली, त्या त्या अवयवाच्या नावाने गावांची नावे पडलेली आहेत. रामरायांनी ज्या स्थानावरून हरणाला बाण मारला, त्या ठिकाणी व हरणाला ज्या ठिकाणी इजा झाली तेथे प्रायश्चित्त म्हणून शिवलिंग स्थापन करून भगवान शंकरांची उपासना केली. मारीच नामक हरणाने ज्या ठिकाणी प्राण सोडले त्या ठिकाणी आताही प्राचीन असे "श्री मृगव्याद्धेश्वर मंदिर" असे शिव मंदिर आहे.
प्राचीन श्री मृगव्याद्धेश्वर मंदिर.
श्री मृगव्याद्धेश्वर मंदिरती प्राचीन शिवलिंग.
श्री मृगव्याद्धेश्वर मंदिरती प्राचीन घंटा.
शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांची वारकरी संप्रदायातील ग्रंथ संपदा सर्वांत जास्त आहे. त्यांचे गुरू "श्री जनार्दन स्वामी महाराज" यांचे नाशिक मधील तपश्चर्येचे ठिकाण. नाथांनी येथे साधणा केली होती, तसेच सदर ठिकाणी त्यांनी "चतुःश्लोकी भागवत" हा त्यांचा अतिशय महत्वाचा व आयुष्यातील पहिला ग्रंथ लिहिलेला होता. त्यानंतर अशा अतिशय पवित्र वातावरणात भागवताचे अभ्यासक नित्य येऊन भागवताचे अध्ययन, पारायण व चिंतन करीत. 'देवगिरी (दौलताबद) किल्यात असलेल्या चरण कमलां प्रमाणे' इथेही फक्त पादुका स्थापित केलेल्या होत्या, आत्ता मंदिरात असलेली गरुडावर विराजमान अशी लक्ष्मी-नारायणाची मूर्ती मध्यंतरीच्या काळात भाविकांनी स्थापित केलेली असल्याचे जाणवते.
मंदिरात स्थापित असलेल्या पादुकांचे स्वरूप.
0
गरुडावर विराजमान अशी लक्ष्मी-नारायणाची मूर्ती.
3) नाथ षष्ठी 2022 साली मंदिरात झालेल्या नाथषष्ठी उत्सवानिमित्त झालेल्या भजनाचे क्षणचित्रे .
4) नाथ षष्ठी 2022 प्रसंगी सदर मंदिरात झालेल्या नाथषष्ठी उत्सवानिमित्त झालेल्या भजनाची वार्तापत्रकांमध्ये आलेली प्रसिद्धी.
5) दरम्यानच्या काळात एकनाथ सष्ठीचा परंपरेने छोट्या प्रमाणात होणारा उत्सव त्रयस्थ इसम यांनी पून्हा मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे. तेथील गरजू लोकांना उपयोग व्हावा म्हणून 13 मार्च 2023 रोजी, नाथशष्टी उसत्वाचे घेतलेले मोफत आरोग्य तपासणी शिबीर.
6) 13 मार्च 2023 रोजी झालेल्या नाथशष्टी उसत्वाचे दरम्यान झालेल्या पारंपरिक भजनाचे क्षणचित्र.
(नाथशष्टी उसत्वाच्या कार्यक्रमाच्या आधल्या दिवशी झालेल्या दुर्घटने मुळे डोक्यावर जखम व पट्टी लावलेली आहे.)
7) रविवार, 31 मार्च 2024 साली होणाऱ्या नाथषष्ठी उत्सवाच्या अगोदर मंदिराची असलेली दुरावस्था.
( पूर्वीपासून सदर मंदिरामध्ये शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचेच मंदिर आहे असे लोक प्रसिद्ध व सर्वमान्य असल्याचे चिन्ह स्पष्ट दिसतात. त्याचे एक कारण म्हणजे, "पूर्वी मंदिरामध्ये लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती शेजारी संत एकनाथ महाराज यांचा फोटो लावलेला होता. पण शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांचे गुरू म्हणजे भगवान दत्तात्रयांचे निस्सिम भक्त की, ज्यांना भगवान दत्तात्रय नित्य येऊन दर्शन व उपदेश करीत असे देवगिरीचे (दौलताबदचे) किल्लेदार "श्री जनार्दन स्वामी महाराज" यांचा फोटो पूर्वीच्या भाविकांकडे कदाचित नसावा, म्हणून पूर्वीच्या भाविकांनी जनार्दन स्वामींचा फोटो मंदिरात असावा, म्हणून जनार्दन स्वामींचा फोटो लावण्याच्या उपदेशाचे सध्याचे जनार्दन स्वामी मठाचे आद्य गुरु, जनार्दन स्वामी यांचा श्रद्धा पूर्वक, चुकून फोटो लावलेला असल्याचे जाणवते.)
8) मंदिराच्या दुरुस्तीचे काम चालू असतानाचे क्षणचित्र.
9) मंदिर दुरुस्ती व रंगारंगोटी तसेच विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाल्या नंतरचे क्षणचित्रे.
( हा आहे तो दुर्मिळ फोटो….. जात दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदाय याचे विलक्षन भेट झालेले दिसून येते.
१. भगवान दत्तात्रय, २. शांतीब्रम्ह श्री. संत एकनाथ महाराज यांचे गुरु, म्हणजेच भगवान दत्तात्रयांचे निस्सिम भक्त की ज्यांना भगवान दत्तात्रय नित्य येऊन दर्शन व उपदेश करीत असे, देवगिरीचे (दौलताबदचे) किल्लेदार श्री संत जनार्दन स्वामी महाराज व ३. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज.) (हा काचेच्या फ्रेममध्ये तयार केलेला फोटो मंदिराचे काम पूर्ण केल्यानंतर मंदिरात तयार करून लावलेला आहे.)
10) रविवार 31 मार्च 2024 नाथषष्ठी उत्सवानिमित्त सकाळी दहा वाजेच्या सुमारास तेथील गरजू नागरिकां करता आयोजित केलेले मोफत नेत्र तपासणी शिबिरचे क्षणचित्र.
11) रविवार 31 मार्च 2024 नाथषष्ठी उत्सवा निमित्त झालेले भजन .
12) परिसरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित, बापट चॅरिटेबल ट्रस्ट व राष्ट्रीय विकास मंडळ, यांचे सोबत वस्तीतील एका घरात शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली मोफत अभ्यासिकेचा ( शिकवणी ) प्रारंभाचे क्षणचित्र.
13) शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज अभ्यासिके ( शिकवणी ) मार्फत वस्तीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व दप्तर यांचे वाटप करतांनाचे क्षणचित्र.
14) मध्यंतरी चे काही स्मरणीय क्षण.
15) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित, राष्ट्रीय विकास मंडळ यांच्या मदतीने, शहरात वाढत असलेली डेंग्यूची साथ बघता, परिसरातील गरजू लोकांना उपयोग व्हावा म्हणून दि. 28/9/2023 रोजी, घेतलेल्या मोफत रक्त तपासणी शिबीर प्रसंगी.
16) अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी यांचे शुभहस्ते शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या या मंदिरात, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या एका छान मूर्तीचे पूजन केले.
17) मंदिरावर "श्री संत एकनाथ महाजन मंदिर , तपोवन" हे नाव टाकतांना चे क्षणचित्र.
चतुःश्लोकी भागवत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!