द्वारका (किंवा द्वारिका) हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर १७ वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. १८ व्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा याच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी या प्रवेशद्वाराची रचना होती, असे सांगितले जाते.
आजच्या द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे.
आदि शंकराचार्यांनी जी चार पीठे स्थापन केली त्यांपैकी एक पीठ द्वारका येथे आहे, त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ म्हणतात. (इतर पीठे (मठ) - दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथी गोवर्धन मठ, उत्तरांचल राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ).
आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. ह्या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली.
आजही (२०१९ साली) बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर आहे. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येते.
कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला, पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. इथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली.पांडवांना समर्थन दिले. धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्त्व आहे तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत.
द्वारका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.