महादेवी, हिला आदि पराशक्ती, आदिशक्ती आणि अभय शक्ती असेही संबोधले जाते. ही हिंदू धर्मातील शक्ती पंथातील सर्वोच्च देवी आहे. या परंपरेनुसार, सर्व हिंदू देवींना या एकमेव महान देवीचे स्वरूप मानले जाते, ज्याची तुलना परब्रह्म म्हणून विष्णू आणि शिव या देवतांशी केली जाते. वैष्णव तिला लक्ष्मी मानतात. शैव तिला पार्वती, दुर्गा आणि महाकाली मानतात. तर शाक्त तिला दुर्गा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी आणि काली मानतात. लेखिका हेलन टी. बोर्सियर म्हणतात: "हिंदू तत्त्वज्ञानात, लक्ष्मी आणि पार्वती या दोघींना महान देवी — महादेवी — आणि शक्ती किंवा दैवी शक्ती म्हणून ओळखले जाते".
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महादेवी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.