रिया मजुमदार सिंघल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

रिया मजुमदार सिंघल

रिया मजूमदार सिंघल (१९८२) ही एक भारतीय उद्योजिका आहे जी अपघटनक्षम तथा विल्हेवाट लावण्याजोगी (बायोडिग्रेडेबल डिस्पोजेबल ) उत्पादने तयार करते. तिला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये नारी शक्ती पुरस्काराचा सुद्धा समावेश आहे .

सिंघलचा जन्म इस १९८२ मध्ये मुंबईत झाला. तिचे शिक्षण ब्रिस्टल, ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठांमध्ये झाले. तिने लंडन आणि दुबईमध्ये बराच काळ घालवला आणि २००९ मध्ये ती भारतात परतली. तिने मूळच्या लंडन स्थित भारतातील फायझर औषधोत्पादन कंपनीच्या विक्री विभागात काम केले होते. तेव्हा तिथे तिने पुनर्प्रक्रियेचा (रिसायकलिंग चा) कोणताही विचार न करता मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची विल्हेवाट लावताना पाहिले. तिच्या मनाला हे अजिबात पटले नाही, म्हणून मे २००८ मध्ये तिने भारतात अपघटनक्षम तथा विल्हेवाट लावण्याजोगी (बायोडिग्रेडेबल) उत्पादने तयार करण्यासाठी एक दशलक्ष मूल्य असलेली एक कंपनी सुरू केली.



तिने यात २० कर्मचारी कामाला लावले. ती बाजारपेठेत तिच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी बाहेर पडली असता तिला अत्यंत खराब प्रतिसाद मिळाला. तिची उत्पादने ९० दिवसात मातीमध्ये कुजून जाणारी होती. परंतु त्यांची तुलना सामान्य प्लास्टिकशी केल्या गेली, ज्यात की प्रत्येक मनुष्य वापरत असलेल्या प्लास्टिकचा बराचसा भाग कुठेतरी जमिनीत अंश रूपाने का होईना, पण असतो.

तिची कंपनी स्वयंपाक घरात वापरल्या जाणारी कात्री, चाकू तथा थाळ्या (कटलरी आणि प्लेट्स) सारख्या अपघटनक्षम वस्तूंची मोठी श्रेणी तयार करते. ह्या वस्तू शेतीमाल आणि धान्य उद्योगातील कचऱ्यापासून बनवल्या जातात. नंतर लवकरच तिला एक अत्यंत महत्त्वाचे ग्राहक मिळाले आणि ते म्हणजे भारतीय रेल्वे होय.

इस. २०१९ मध्ये तिला भारतातील "शाश्वत अन्न पॅकेजिंग उद्योगाचे नेतृत्व करण्यासाठी" महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. तिची नामनिर्देशित केलेल्या १,०००हून अधिक लोकांमधून निवड करण्यात आली. हा पुरस्कार नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आला. त्या साली नारी शक्ती पुरस्कार मिळवणाऱ्या ४०पेक्षा जास्त महिलांपैकी ती एक महिला होती. नारी शक्ती पुरस्कार हा भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च सन्मान असलेला पुरस्कार असून, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सध्या ती, तिचा पती निशांत सिंघल आणि दोन मुलांसह दिल्लीत राहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →