रिपब्लिक टीव्ही ही उजवी राजकीय विचारसरणी असलेली भारतातील एक मोफत इंग्रजी वृत्तवाहिनी आहे. अर्णब गोस्वामी आणि राजीव चंद्रशेखर यांनी त्याची सह-स्थापना केली होती, नंतर मे 2019 मध्ये चंद्रशेखर यांनी आपला हिस्सा सोडून दिला, परिणामतः बहुसंख्य भागधारक म्हणून गोस्वामी हेच राहिले. चंद्रशेखर हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्वतंत्र आमदार होते जे नंतर भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले; तर गोस्वामी हे टाइम्स नाऊचे माजी मुख्य संपादक होते. या कंपनीला मुख्यतः चंद्रशेखर यांनी त्यांच्या एशियानेट न्यूझ कंपनीद्वारे निधी दिला होता.
रिपब्लिक टीव्हीचा समीक्षणात्मक प्रतिसाद नकारात्मक आहे. या चॅनलवर सत्ताधारी भाजपच्या बाजूने पक्षपाती वार्तांकन करण्याचा आणि सरकारविरोधी असंतोष दाबण्याचा प्रयत्न केल्याचा नेहमी आरोप होतो; या चॅनलवर बनावट बातम्या आणि इस्लामोफोबिक वक्तृत्व अनेक प्रसंगी प्रकाशित केले गेले. रिपब्लिक टीव्हीला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि न्यूझ ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे.
रिपब्लिक टीव्हीवर दर्शक संख्येच्या रेटिंगमध्ये फेरफार केल्याचा आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. वाढवलेला टीआरपी कथितपणे जाहिरातदारांकडून जास्त महसूल मिळवण्यासाठी वापरला गेला होता.
रिपब्लिक टीव्ही
या विषयातील रहस्ये उलगडा.