अर्णब गोस्वामी (जन्म: ७ मार्च १९७३) हे एक वृत्तनिवेदक आणि भारतीय पत्रकार आहेत. ते रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संपादक आहेत.
रिपब्लिक टीव्हीच्या आधी, गोस्वामी हे 2006 ते 2016 पर्यंत टाइम्स नाऊ आणि ईटी नाऊचे मुख्य संपादक आणि वृत्त अँकर होते. यापूर्वी त्यांनी एनडीटीव्ही आणि द टेलिग्राफमध्येही काम केले होते. टाईम्स नाऊवर असताना रात्री ९ वाजता ते द न्यूझहॉर या थेट वादविवादाचे संचालन करायचे. या कार्यक्रमाने त्यांना व्यापक प्रसिद्धी दिली. तसेच फ्रँकली स्पीकिंग विथ अर्णब या विशेष कार्यक्रमाचे ते आयोजन करत होते.
नोव्हेंबर 2016 मध्ये, गोस्वामी यांनी टाइम्स नाऊच्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिला आणि रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनी मे 2017 मध्ये त्यांनी सुरू केली.
अर्णब गोस्वामी
थोडक्यात पण महत्त्वाचे.