रितेश देशमुख ( १७ डिसेंबर १९७८) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता आहेत तसेच ते भारतीय वास्तुकार आणि निर्माता देखिल आहेत. रितेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र आहेत. २००३ सालच्या चित्रपट तुझे मेरी कसमद्वारे रितेश यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला मस्ती या चित्रपटापासून त्यांना व्यापारीदृष्ट्या यश मिळण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर त्यांनी क्या कूल है हम, ब्लफमास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, दे ताली, हाऊसफुल्ल, डबल धमाल, तेरे नाल लव हो गया, हाऊसफुल्ल २, क्या सुपर कूल है हम, ग्रँड मस्ती अशा यशस्वी चित्रपटांत त्यांनी काम केले. रितेश यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी आलेल्या काही सिनेमांद्वारे विनोदी कलाकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली. रितेश यांनी २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिका साकारली व ती प्रचंड लोकप्रिय ठरली.
जानेवारी २०१३ मध्ये रितेश यांनी पहिल्यांदाच बालक-पालक ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लय भारी चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटांसोबतच रितेश यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलन देखील केले आहे. रितेश यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेश यांनी पटकावले आहेत. अभिनयाशिवाय, सेलेब्रिटी क्रिकेट लीग मधील 'वीर मराठी' नावाचा संघ त्यांचा आहे तसेच ते या संघाचे कर्णधार देखील आहेत.
रितेश देशमुख
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.