दीपशिखा देशमुख (विवाहपूर्व: भगनानी ) ह्या एक भारतीय चित्रपट निर्माता आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात. चित्रपट निर्माता वासू भगनानी आणि पूजा भगनानी यांच्या त्या कन्या असून अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांची बहीण आहेत. तिने पूजा एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०२० मध्ये, तिने जवानी जानेमन आणि त्याच नावाने १९९५ च्या कल्ट क्लासिक 'कुली नंबर-१'चा रिमेक तयार केला. दीपशिखा 'लव्ह ऑर्गॅनिकली' या ऑरगॅनिक स्किनकेअर ब्रँडचीही संस्थापक आहे.
दीपशिखा देशमुख ने विलासराव देशमुख यांचे पुत्र तथा आमदार धिरज देशमुख यांच्याशी २७ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत.
दीपशिखा देशमुख
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.