जेनीलिया डिसूझा (ऑगस्ट ५ इ.स. १९८७; मुंबई ,महाराष्ट्र - हयात) (तमिळ :ஜெனிலியா ; तेलुगू: జెనీలియా ; रोमन लिपी: Genelia D'Souza) या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. तेलुगू चित्रपटातील त्या एक आघाडीच्या नायिका आहेत. तेलुगू खेरीज त्यांनी तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या मस्ती, फोर्स, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. फेब्रुवारी २०१२ मध्ये अभिनेते रितेश देशमुख यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. इ.स. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लई भारी (चित्रपट) चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेनेलिया डिसूझा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.