रिचर्ड ड्रायफस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रिचर्ड ड्रायफस

रिचर्ड स्टीफन ड्रायफस (जन्म २९ ऑक्टोबर १९४७) एक अमेरिकन अभिनेता आहे. अमेरिकन ग्राफिटी (१९७३), जॉस (१९७५), क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काइंड (१९७७), द गुडबाय गर्ल (१९७७), द कॉम्पिटिशन (१९८०), स्टँड बाय मी (१९८६), डाउन अँड आउट इन बेव्हरली हिल्स (१९८६), स्टेकआउट (१९८७), नट्स (१९८७), द अमेरिकन प्रेसिडेंट (१९९५), आणि मिस्टर हॉलंडस ओपस (१९९५) या लोकप्रिय चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी तो ओळखला जातो.

ड्रायफसने द गुडबाय गर्लसाठी १९७७ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. त्यावेळी तो ३० वर्षांचा सर्वात तरुण अभिनेता होता. तो गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा प्राप्तकर्ता आहे, आणि २००२ मध्ये दोन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →