रिंकी रॉय भट्टाचार्य (जन्म १९४२) या एक भारतीय लेखक, स्तंभलेखक आणि माहितीपट चित्रपट निर्मात्या आहेत. या चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांची मुलगी आहे. यांनी बासू भट्टाचार्यशी लग्न केले. तसेच त्याच्या चित्रपटांमध्ये सहकार्य केले. त्या ' चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया ' (सी एफ एस आय)च्या उपाध्यक्ष आणि ' बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटी'च्या संस्थापक अध्यक्ष आहेत. एक स्वतंत्र पत्रकार म्हणून त्या टाइम्स समूह, द टेलिग्राफ, द हिंदू आणि द इंडियन एक्स्प्रेस सारख्या प्रकाशनांसाठी चित्रपट, नाट्य, कला आणि स्त्रीवादी विषयांवर भरपूर लेखन करत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिंकी भट्टाचार्य
या विषयावर तज्ञ बना.