राहत इंदौरी (जन्म: राहत कुरेशी, १ जानेवारी १९५० - ११ ऑगस्ट २०२०) हे एक भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी होते. ते उर्दू भाषेचे माजी प्राध्यापक आणि चित्रकार देखील होते. याआधी ते देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर मध्ये उर्दू साहित्याचे अध्यापनतज्ज्ञ होते.
१० ऑगस्ट २०२० रोजी भारतात कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान त्यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांना इंदूर येथील अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी ११ ऑगस्ट २०२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
राहत इंदौरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!