राष्ट्रीय सुरक्षा ही त्या देशाचे अस्तित्त्व टिकविण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी,ताकदीचे प्रक्षेपण या व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जाते.ही बाब प्रथमतःदुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेत उदयास आली.तसेच, ती राखण्यास आर्थिक सुरक्षा, उर्जा सुरक्षा व पर्यावरण सुरक्षा, सैन्याची ताकद व सायबरसुरक्षा ह्याही बाबी महत्त्वाच्या समजल्या जातात.
राष्ट्रीय सुरक्षा , किंवा राष्ट्रीय संरक्षण, यात सार्वभौम राज्याची सुरक्षा आणि संरक्षण अंतर्भूत आहे, त्यात नागरिक, अर्थव्यवस्था आणि संस्था यांचा समावेश होतो, आणि हे सरकारचे कर्तव्य मानले गेले आहे. लष्करी हल्ल्यापासून संरक्षण म्हणून, राष्ट्रीय सुरक्षेमध्ये दहशतवादापासूनची सुरक्षा, गुन्हेगारी कमी करणे , आर्थिक सुरक्षा , ऊर्जा सुरक्षा, पर्यावरणीय सुरक्षा, यासह गैर-लष्करी आयामांचाही समावेश केला जातो.
राष्ट्र राज्याच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सरकार; राजकीय , आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य तसेच मुत्सद्देगिरीसह अनेक उपायांवर अवलंबून असते.
राष्ट्रीय सुरक्षा
यामागील विज्ञान आणि इतिहास.